आज श्री. प्रफुल्ल पटेल यांनी कर्जत येथे चालत असलेल्या पक्षाच्या बैठकीत २०१९ मध्ये पवार साहेब देशाचे प्रधानमंत्री बनू शकतात असे सांगितले. १९९९ साली स्थापित झालेल्या वाजपेयी सरकार मध्ये पवार साहेबांना आमंत्रण देण्यात आलं होत असं पण त्यांनी सांगितलं. पवार साहेब मात्र जुळले नाही. सध्या विरोधी असलेल्या ममता बॅनर्जी देखील त्यावेळी सामील झाल्या. पण पवार साहेबांनी मात्र नाकारलं.
पुरोगामी तत्वांवर बनलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष शरद पवार साहेबांनी आजपर्यंत आपले तत्व कधी वेठीवर बसवले नाहीत. पक्ष आणि विचारधारा यांना कधीही स्वतःच्या पदासाठी वापरलेलं ठाऊक नाही. काँग्रेस पक्ष दोनवेळा सोडला तरी तो फक्त पक्षातील बिघडत चालेल्या संस्कृतीमुळे. एकंदरीत सांगायचं झालं तर पक्ष आणि तत्वांना सर्वोच स्थान मनात देऊन पुढारलेली व्यक्ती असा पवार साहेबांचा लौकिक आहे. असंख्य आरोप करून फक्त विडंबन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विरोधकांना पवार साहेबांवर एकही आरोप सिद्ध करता आला नाही. हे सगळं ठाऊक असतांना या नावाचा विचार काँग्रेस ने कधीच करायला हवा होता.
अनेकवेळा प्रसारमाध्यमातून जेटली आणि मोदी यांची बारामती शहराबद्धलची भावना समोर येतेच. महाराष्ट्रातील ज्या ज्या भागातून राष्ट्रवादीला सत्ता मिळाली तिथं घडलेली विकास कामे शर्थीवर पहावीत. राज्यात विकासकामासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हात कोणालाही धरता येणार नाही. मग अशावेळी राज्यातील जनतेने हे सर्वोच्च पदावर महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या पवार साहेबांना राजकीय वाटचालीसाठी पुरेपूर मदत करायलाच हवी. पुणे, बारामती, पिंपरी-चिंचवड, सातारा, नवी मुंबई, इत्यादी कितीही नाव घ्या. योगदान कोणाचं आहे ते पहा.
या पंतप्रधानांच्या मुद्द्यावर चर्चा तेव्हा करू जेव्हा पवार साहेब काही बोलतील. तत्पूर्वी काही बोलण्यास विशेष अर्थ नाही. पण देशाला आपल्या राज्यातून नेता मिळायला नको का? मित्रांनो तुम्ही कुठल्याही पक्षाला समर्थन करणारे असाल तर इतक्यासाठी प्रेमाने हाथ पुढे करून महाराष्ट्र एकटवण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शंभर टक्के आहे!

